सिडनी : आयसीसी वर्ल्डकप २०१५ च्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये गुरुवारी सिडनी क्रिकेट मैदानात (एससीजी) भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या लढतीत भारताचा पराभव झालाय. ऑस्ट्रेलियानं तब्बल 95 रन्सनं भारतावर मात केलीय.
LIVE स्कोअरकार्ड पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑस्ट्रेलियानं समोर ठेवलेल्या ३२९ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करता करता टीम इंडियाची दाणादाण उडाली. टीम इंडियातल्या खेळाडुंपैकी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सर्वांत जास्त म्हणजे 65 रन्सची भागिदारी करण्यात यशस्वी ठरला... तर भारताचा धुरंधर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली केवळ एक रन देऊन तंबूत परतला. कोहलीनं 13 बॉल्समध्ये 1 रन दिला. तर मोहीत शर्मा आणि उमेश यादव भोपळाही फोडू शकले नाहीत.
रोहीत शर्मा 34 रन्स, शिखर धवन 45 रन्स, अजिंक्य राहाणे 44 रन्स, सुरेश रैना 7 रन्स, रविंद्र जडेजा 16 रन्स, आर. अश्विन 5 रन्स आणि मोहम्मद शमी नाबाद 1 रन्सची भागीदारी करू शकले.
ऑस्ट्रेलियानं भारतासमोर ३२९ रन्सचं टार्गेट समोर ठेवलं. ऑस्ट्रेलियानं आपल्या घरच्या मैदानावर भारताविरुद्ध मजबूत सुरुवात केली. ७ विकेट गमावत ऑस्ट्रेलियानं ३२८ रन्स ठोकले.
स्टीव्ह स्मिथनं शानदार खेळी खेळत शतक ठोकलंय. स्मिथनं ७३ बॉल्समध्ये १०५ रन्स दिले.
फिंच ८१ रन्स करून आऊट झाला. तर, वॉर्नर १२ रन्स, मॅक्सवेल २३ रन्स, शेन वॉटसन २८ रन्स, मायकल क्लार्कनं १० रन्स, जेम्स फॉकनर २१ रन्स, हेडीन ७ रन्स आणि मिशेल जॉनसननं २७ रन्सचं योगदान दिलं.
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कनं टॉस जिंकून एससीजी मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. उल्लेखनीय म्हणजे, एससीजी मैदानात आत्तापर्यंत भारतानं १४ मॅचेस खेळल्यात आणि त्यातील केवळ एका मॅचमध्ये टीम इंडिया विजय मिळवू शकलीय.
टीम इंडिया : महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, आर. अश्वीन, मोहम्मद शमी, मोहीत शर्मा आणि उमेश यादव
टीम ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कॅप्टन), आरोन फिंच, डेविड वॉर्नर, स्टीवन स्मिथ, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर, ब्राड हेडीन, मिशेल जॉनसन, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.