हैदराबाद टेस्ट वाचवण्याचे बांग्लादेशचे शर्थीचे प्रयत्न

 हैदराबाद टेस्ट वाचवण्यासाठी बांग्लादेशची टीम शर्थीचे प्रयत्न करतंय.

Updated: Feb 11, 2017, 07:29 PM IST
हैदराबाद टेस्ट वाचवण्याचे बांग्लादेशचे शर्थीचे प्रयत्न  title=

हैदराबाद : हैदराबाद टेस्ट वाचवण्यासाठी बांग्लादेशची टीम शर्थीचे प्रयत्न करतंय. तिस-या दिवसअखेर बांग्लादेशनं 6 विकेट्स गमावून 322 रन्सपर्यंत मजल मारली. दिवसाअखेरीस कॅप्टन मुशफिकर रहिम 81 आणि मेहेदी हसन मिराझ 51 रन्सवर नॉट आऊट आहेत.

बांग्लादेशची टीम अजूनही भारताच्या 365 रन्सपर्यंत पिछाडीवर आहे. बांग्लादेशनं 1 विकेट 41 रन्सवरुन खेळण्यास सुरुवात केली. भारतीय बॉलर्सनी भेदक मारा करत बांग्लादेशची अवस्था 4 विकेट्स गमावून 109 रन्स अशी बिकट केली होती. त्यानंतर शाखिब उल हसन आणि कॅप्टन मुशफिकर रहिमनं पाचव्या विकेटसाठी 109 रन्सची पार्टनरशिप करत बांग्लादेशची आणखी पडझड होऊ दिली नाही.

शाकिब 82 रन्सवर आऊट झाल्यानंतर युवा मेहेदी हसननं मुशफिकरबरोबर मॅचची सारी सूत्र हाती घेतली. त्यानं टेस्टमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. मेहेदी हसन आणि मुशफिकरनं भारतीय स्पिनर्सचा यशस्वी सामना केला. आता टेस्टच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशची इनिंग झटपट गुंडाळण्याचं आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असेल.