'वर्ल्डकप 2015' मध्ये भारताचा पहिलाच सामना पाकस्तानशी

‘वर्ल्डकप क्रिकेट टूर्नामेंट’ची सुरुवात येत्या वर्षात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, या वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.  

Updated: Sep 12, 2014, 01:55 PM IST
'वर्ल्डकप 2015' मध्ये भारताचा पहिलाच सामना पाकस्तानशी title=

मेलबर्न : ‘वर्ल्डकप क्रिकेट टूर्नामेंट’ची सुरुवात येत्या वर्षात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, या वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.  

14 फेब्रुवारी सुरू होणारी ही टूर्नामेंट 29 मार्चपर्यंत सुरु राहील. जगभरातील एकूण 14 टीम्स यामध्ये सहभागी होणार आहेत. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार या टीम्सना दोन ‘ग्रुप्स’मध्ये विभागण्यात आलंय. 

महत्त्वाचं म्हणजे, भारत आणि पाकिस्तान ‘ग्रुप बी’ या एकाच ग्रुपमध्ये आलेत. 

पाहुयात वर्ल्डकपसाठीचे दोन ग्रुप्स :
ग्रुप 'ए' : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, आयरलँड 
ग्रुप 'बी' : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, झिम्बॉम्वे, आयरलँड, यूएई

14 फेब्रुवारी रोजी वर्ल्डकपमधली पहिली मॅच न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चमध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड दरम्यान होईल. तर दुसरी मॅच असेल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये... 

यंदा, वर्ल्डकपमध्ये भारताची पहिलीच टक्कर पाकिस्तानशी होणार आहे. वर्ल्डकपच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी या दोन्ही टीम्समध्ये मॅच रंगणार आहे. दिवस-रात्रीची ही मॅच ओव्हल, एडिलँडमध्ये खेळली जाईल. आपल्याच टीममध्ये भारताचा दुसरा सामना रंगेल तो 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध... 

भारतानं 1983 साली वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये भारतीय टीम उपविजेता ठरली. 2011 साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं मुंबईत तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा विश्व चॅम्पियनपदावर आपलं नाव उमटवलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.