नवी दिल्ली : फिरोजशहा कोटला स्टेडियमवरील द. आफ्रिकेविरुदधच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात २३१ धावा केल्यात. अजिंक्य रहाणे शतकासमीप असून तो ८९ धावांवर खेळत आहे.
नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र पहिल्या दिवशी तो आफ्रिकेच्या पथ्यावर पडल्याचे दिसले. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची पुरती भंबेरी उडाली. सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात केली. मात्र विजय झटपट बाद झाला.
शिखरने ३३ धावा करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चेतेश्वर पुजारा १४ धावांवर परतला. कर्णधार विराट कोहलीला ४४ धावा करता आल्या. मात्र त्याचे अर्धशतक सहा धावांनी हुकले. विराट आणि अजिंक्यने चौथ्या विकेटसाठी केलेली ७० धावांची भागीदारी पहिल्या दिवसांतील सर्वात मोठी भागीदारी ठरली.
अंधुक प्रकाशामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला. मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने पंचानी अखेर खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर अजिंक्य ८९ धावांवर खेळत असून आर. अश्विन सहा धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाकडून डेन पिड्ट (४ विकेट) आणि काईल अबॉट(३ विकेट) यांनी उत्तम कामगिरी केली.
पाहा लाइव्ह स्कोअरकार्ड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.