याच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास

२५ जून १९८३ भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय असा दिवस. याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजला हरवत पहिल्या वहिल्या वर्ल्डकप जेतेपदाव नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. 

Updated: Jun 25, 2016, 09:09 AM IST
याच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास title=

मुंबई : २५ जून १९८३ भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय असा दिवस. याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजला हरवत पहिल्या वहिल्या वर्ल्डकप जेतेपदाव नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. 

कर्णधार कपिल देवने वर्ल्डकपचा चषक उंचावला आणि प्रत्येक भारतीयाची अभिमानाने मान उंचावली. या सामन्यात भारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजला केवळ १४० धावा करता आल्या. अमरनाथच्या गोलंदाजीवर होल्डिंग बाद झाला आणि समस्त भारतीयांनी एकच जल्लोष केला. क्रिकेटच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले होते. 

तो क्षण पाहा पुन्हा एकदा व्हिडीओतून