अजिंक्य राहणे अडकणार लग्नाच्या बेडीत

भारतीय क्रिकेट टीमचा बॅचलर अजिंक्य रहाणे हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याचे राधिका नावाच्या मुलीबरोबर विवाह होणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख २६ सप्टेंबर २०१४ असल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated: Sep 20, 2014, 08:45 PM IST
अजिंक्य राहणे अडकणार लग्नाच्या बेडीत title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा बॅचलर अजिंक्य रहाणे हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याचे राधिका नावाच्या मुलीबरोबर विवाह होणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख २६ सप्टेंबर २०१४ असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजिंक्य यांने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली. इंग्लंडच्या मैदानावर त्याची विकेट काढण्यात इंग्लीश बॉलरना अपयश आले. मात्र, त्याची प्रेमाने राधिका हिने विकेट काढली आहे. राधिकासोबत नवीन आयुष्याला तो लवकरच सुरुवात करणार आहे.

26 वर्षांचा अजिंक्य हा राधिकासोबत विवाह करणार आहे. दोघेही मराठी असून मुलुंड इथे राहतात. 26 सप्टेंबर हा त्याच्या विवाहचा मुहूर्त ठरला आहे. अजिंक्य तसा लाजरा आहे. त्याच्या वडिलांनी त्याला कराटे प्रशिक्षणाचा आग्रह धरला. पट्याने यातही ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. अजिंक्यला गाणी ऐकण्यास आवड आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.