'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Updated: Feb 11, 2015, 04:46 PM IST
'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा' title=

मुंबई: 14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

धोनी उत्तर शोधायला जातो, पण समोर येतात आणखी प्रश्न!

संघ व्यवस्थापनाने वर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना कोणत्याही वादापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून त्यांनी फेसबुकवर मित्र बनवतांना खूप सावधगिरी बाळगण्याचे आणि ट्विटरचा वापरही काळजीपूर्वक करण्याचे आदेश दिले आहेत.

सोबतच खेळाडूंना सांगितलं गेलंय की, महिलांपासून दूर राहा. कोणत्याही नव्या स्पॉन्सरच्या संपर्कात येण्यापासून वाचा आणि कोणत्याही एजंटला भेटू नका. शिवाय यंदा खेळाडूंना आपल्या सोबत खोलीत आपली पत्नी आणि गर्लफ्रेंडला आणण्याची परवानगी नसेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.