कोलकात्याचा पुण्यावर दमदार विजय

आयपीएलच्या दहाव्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर जबरदस्त विजय मिळवलाय. 

Updated: Apr 26, 2017, 11:18 PM IST
कोलकात्याचा पुण्यावर दमदार विजय title=

पुणे : आयपीएलच्या दहाव्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर जबरदस्त विजय मिळवलाय. 

पुण्याने विजयासाठी ठेवलेले १८३ धावांचे आव्हान कोलकात्याने ७ विकेट राखून पूर्ण केले आणि मोसमातील सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह कोलकात्याने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय.

कोलकात्याकडून रॉबिन उथप्पाने ४७ चेंडूत ८७ धावा कुटल्या. तर दुसरीकडे कर्णधार गौतम गंभीरने त्याला जबरदस्त साथ दिली. त्याने ४६ चेंडूत ६२ धावांची तडाखेबंद खेळी केली.