कोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव

 ख्रिस वोक्स, नॅथन कॉल्टर आणि ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने आरसीबीला तब्बल ८२ धावांनी हरवले, आयपीएलच्या इतिहासात इतक्या कमी स्कोरमध्ये पहिल्यांदाच एखादा संघ बाद झाला असेल.

Updated: Apr 24, 2017, 12:30 AM IST
कोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव title=

कोलकाता :  ख्रिस वोक्स, नॅथन कॉल्टर आणि ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने आरसीबीला तब्बल ८२ धावांनी हरवले, आयपीएलच्या इतिहासात इतक्या कमी स्कोरमध्ये पहिल्यांदाच एखादा संघ बाद झाला असेल.

कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३१ धावा केल्या. त्यामुळे हे आव्हान बंगळुरुसाठी काही मोठे नव्हते. मात्र आयपीएलच्या इतिहासात गेल्या १० वर्षात जे घडले नव्हते ते आज घडले. 

१३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटचा संघ अवघ्या ४९ धावांत गारद झाला. कॉल्टरने चार विकेट घेतल्या तर यादवने तीन विकेट घेतल्या.