नवी दिल्ली : लंकाशायरचा ऑलराऊंडर क्रिकेट लियम लिविंग्स्टोन यानं आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्डचा धुव्वा उडवत वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत मोठी खेळी खेळण्याची 'वर्ल्ड रेकॉर्ड' कायम केलाय.
लिविंग्स्टोननं १३८ बॉल्समध्ये दमदार ठोकमठाक करत ३५० रन्स केलेत. या दरम्यान त्यानं २७ सिक्स आणि ३४ फोर ठोकलेत.
लिविंग्स्टोनच्या उत्कृष्ट खेळीनं आत्तापर्यंतचे मोठ्या खेळीचे सर्व रेकॉर्ड उधलून लावलेत. यापूर्वी हा रेकॉर्ड ३३४ रन्सचा होता. हैदराबादमध्ये झालेल्या एका क्लब स्तरावरच्या वन डे मॅचमध्ये निखिलेश सुरेंद्रण यानं हा रेकॉर्ड कायम केला होता.
इंग्लिश क्रिकेटनं ट्विटरवरून याची माहिती दिलीय.
Liam Livingstone smashes world-record score of 350 off 138 balls
http://t.co/NX6UjJfy3l pic.twitter.com/oE5ksrVjzd
— England Cricket (@ECB_cricket) April 19, 2015
लिविंग्स्टोननं भारतााविरुद्ध एका टेस्टमॅचमध्ये फिल्डिंग केलीय. गेल्या वर्षी मॅन्चेस्टरमध्ये तिसऱ्या टेस्ट दरम्यान स्टुवर्ट ब्रॉड जखमी झाल्यानंतर त्याच्याऐवजी लिविंग्स्टोनला खेळण्याची (फिल्डिंगची) संधी मिळाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.