नवी दिल्ली : भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य केलंय. अर्थात, त्याच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या नजरा आपोआप वळल्या त्या अभिनेत्री अनुष्का शर्माकडे...
नात्यांची ओढ प्रत्येकालाच असते, असंही विराटनं यावेळी म्हटलंय. 'टेलीग्राफ' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराटनं आपल्या 'लेडी लक'बद्दल म्हणजेच अनुष्का शर्माबद्दल दिलखुलासपणे चर्चा केलीय.
आपल्या आणि अनुष्काच्या नात्याकडे आपण जगापेक्षा अगदी वेगळ्या नजरेनं पाहत असल्याचंही विराट म्हणतोय. आम्ही दोघंही प्रसिद्ध आहोत. काही लोक आमच्या नात्याकडे एखाद्या फँटसी किंवा पऱ्यांची कथा जशा असतात, तसं पाहतात. परंतु, आमचं नातं तसं मुळीच नाही... हे सत्यतेपासून खूपच दूर आहे.
आपल्या नात्याकडे कसा पाहतोस? असा प्रश्न जेव्हा विराटला विचारण्यात आला तेव्हा आपलं काम आपल्या नात्यांमध्ये येत नाही, असंही विराटनं म्हटलंय.
विराट म्हणतो, आमच्या दोघांचं प्रेम एक सामान्य नातं असावं तसंच आहे. आम्ही निर्णय घेतलाय की आम्हाला जे करायचंय तेच आम्ही करणार... यामध्ये समाजाची लुडबूड किंवा ते याकडे कोणत्या नजरेनं पाहतात, याला आम्ही अजिबात भाव देणार नाही. आमच्यासाठी आमच्याबद्दल लोकांचं मत काय आहे, याचं काहीही महत्त्व नाही. पण, अशा लोकांना आमच्याबद्दल... दोन लोकांचं खाजगी नात्याबद्दल... कोणतंही मत बनवू नका? असं आम्ही कसं सांगणार? लोकांना वाटतं की मी असंच करायला हवं, पण जीवन असं कसं चालणार?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.