लंडन : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लंडन स्कूल ऑफ मार्केटिंग (एलएसएम) च्या यादीत जगातील सर्वात मोठ्या खेळाडू ब्रँड यादीत नववे स्थान मिळाले आहे.
धोनीने या यादीत फुटबॉलचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी, क्रिस्टीयानो रोनाल़्डो यांनाही पाठी टाकले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिनीशर असणाऱ्या धोनीने वीस सर्वाधिक मार्केटेबल खेळाडूंमध्ये अनेक प्रसिद्ध फुटबॉलपटू तसेच सेरेना विल्यम्ससारख्या टेनिस खेळाडूंनाही मागे टाकले आहे.
ही यादी तयार करताना एलएसएमच्या अध्ययनकर्त्यांनी खेळाडूंची व्यक्तिगत ब्रँड वॅल्यू बरोबरचं त्यांची कमाई तसेच सोशल मीडियावरील त्यांची असलेल्या प्रसिद्धीवरही ध्यान दिले आहे.
या अहवालानुसार स्विस टेनिस स्टार रॉजर फेडरर जगातील सर्वाधिक मार्केटेबल खेळाडूचा मान मिळाला आहे. त्यानंतर गोल्फर टायगर वुड्स आणि फिलमिकेलनस यांचा नंबर लागतो.
या यादीत टेनिस खेळाडूंचा जास्त दबदबा आहे. जोकोविच या यादीत सातव्या क्रमांकावर आहे तर त्यानंतर रॉफेल नाडेलचा क्रंमांक लागतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.