'मार्टिना'नं ५८ व्या वर्षी 'ज्युलिया'सोबत बांधली लग्नगाठ!

टेनिस जगतातील पहिला समलैंगिक स्टार म्हणून ओळखली जाणारी मार्टिना नवरातिलोवा हिनं अखेर आपली प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हिच्याशी विवाहबंधनात अडकलीय. 

Updated: Dec 19, 2014, 01:55 PM IST
'मार्टिना'नं ५८ व्या वर्षी 'ज्युलिया'सोबत बांधली लग्नगाठ! title=

न्यूयॉर्क : टेनिस जगतातील पहिला समलैंगिक स्टार म्हणून ओळखली जाणारी मार्टिना नवरातिलोवा हिनं अखेर आपली प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हिच्याशी विवाहबंधनात अडकलीय. 

तब्बल नऊ वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावणाऱ्या महिला टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा हिनं वयाच्या ५८ व्या वर्षी लग्नाचा निर्णय घेतला. ज्युलियानंही तिला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे समलैंगिक जोडपं गेल्या सोमवारी विवाहबंधनात अडकलं. समलैंगिकांच्या विवाहाला मंजुरी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये हा सोहळा पार पडला.

वयाच्या ५८ व्या वर्षी लग्न होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं... पण, हा दिवस उजाडला... हे माझं पहिलंच लग्न असून मी या विवाहामुळे मी खूप खूश आहे, असं मार्टिनानं म्हटलंय. 

सप्टेंबर महिन्यात यूएस ओपन स्पर्धा सुरू असताना मार्टिनानं ज्युलियाला सगळ्यांदेखत गुढघ्यावर बसून प्रपोज केलं आणि लग्नाची मागणी घातली होती. ज्युलियानंही अत्यानंदाने हा प्रस्ताव स्विकारला. 

ज्युलिया ही रशियाची मॉडेल आहे. १९८१ साली तिने सोव्हियत संघाचा किताब जिंकल्यानंतर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. 

या विवाहामुळे समलैंगिकांना उभारी मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी या दोघींनीही व्यक्त केला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.