ग्लासगो : भारताने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात आणखी एक पदक मिळाले आहे. नायजेरियाच्या १६ वर्षांच्या गोल्ड मेडलिस्ट चिका अमालाहा हीने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले आणि त्यात ती पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाती सिंह हिला ब्रॉन्झ मेडल देण्यात आले. तर संतोषी मात्सा हिच्या ब्रॉन्झ पदकाला सिल्वर करण्यात आले.
महिलांच्या ५३ किलो वजनी गटाची स्पर्धा २५ जुलै रोजी झाली होती. यास्पर्धेत भारताच्या संतोषीला ब्रॉन्झ पदक मिळाले होते. तर स्वाती चौथ्या स्थानावर होती. आता डोप टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आल्याने या दोघींना क्रमशः सिल्वर आणि ब्रॉन्झ देण्यात आले आहे.
भारतीय भारोत्तोलन महासंघाचे उपाध्यक्ष सहदेव यादव यांनी सांगितले की, आम्हांला ग्लासगो २०१४ च्या आयोजकांनी अधिकृतरित्या सूचना देण्यात आली. त्यानुसार संतोषीचे ब्रॉन्झ मेडल सिल्वर करण्यात आले आणि चौथ्या स्थानावरील स्वातीला ब्रॉन्झ मेडल देण्यात आले आहे. यामुळे वेटलिफ्टिंगमध्ये भारताला १२ पदक मिळाले आहे. यात तीन सुवर्ण, चार सिल्वर आणि पाच ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे. दिल्ली कॉमनवेल्थपेक्षा ही पदकांची संख्या दोनने अधिक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.