भुताच्या भीतीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला हुडहुडी

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात एका हॉटेलच्या रुममध्ये भूत आहे, अशा संशयावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरिस सोहेल घाबरला आहे. म्हणून त्याने हॉटेलमधील रुम बदलून घेतली आहे.

Updated: Jan 27, 2015, 10:49 AM IST
भुताच्या भीतीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला हुडहुडी title=

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात एका हॉटेलच्या रुममध्ये भूत आहे, अशा संशयावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरिस सोहेल घाबरला आहे. म्हणून त्याने हॉटेलमधील रुम बदलून घेतली आहे.

पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा संघ सध्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आहे. 

ख्राईस्टचर्चमधील रीज लॅटिमर हॉटेलमध्ये पाकिस्तान क्रिकेटपटूंसाठी रुम आरक्षित करण्यात आल्या आहेत. 

या हॉटेलमध्ये क्रिकेटपटू हॅरिस सोहेलला एक रुम देण्यात आली होती. पण, त्याला त्याठिकाणी भुता सारखं काहीतरी दिसल्याचं त्याने म्हटलं आहे.

संघ व्यवस्थापक मावीद अक्रम चीवा यांनी सांगितले, की सोहेलने याबाबतची माहिती प्रशिक्षकांना फोनवरून सांगितली आणि तो खूप घाबरलेल्या अवस्थेत होता. 

प्रशिक्षक जेव्हा त्याच्या रुममध्ये गेले, तेव्हा तो भेदरलेल्या स्थितीत होता आणि त्याला हुडहुडी भरली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुममध्ये नेण्यात आले.

याबाबत हॉटेल प्रशासनाने म्हटले आहे, की हॉटेलमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.