पाकशी बरोबरीचा भारताला पुन्हा 'मौका मौका'

वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने झिम्बाव्वेचा रडतकढत पराभव केला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतापुढे जाण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने आतापर्यंत ४४१ सामने जिंकले आहेत. तर भारताने यूएईचा सामना जिंकून पाकशी बरोबरी केली होती. 

Updated: Mar 2, 2015, 02:03 PM IST
पाकशी बरोबरीचा भारताला पुन्हा 'मौका मौका' title=

मुंबई : वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने झिम्बाव्वेचा रडतकढत पराभव केला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतापुढे जाण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने आतापर्यंत ४४१ सामने जिंकले आहेत. तर भारताने यूएईचा सामना जिंकून पाकशी बरोबरी केली होती. 

आता भारताला पुन्हा वेस्ट इंडिजचा सामना जिंकून बरोबरी करण्याचा मौका मौका आहे. 

वन डे क्रिकेट जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया ५२३ सामन्यांसह पहिला क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान ४४१ सामने जिंकून दुसऱ्या आणि भारत ४४० सामने जिंकून तिसऱ्या क्रमांगावर आहे. भारताचा असाच फॉर्म कायम राहिल्यास भारत पाकिस्तानला मागे टाकू शकतो. 

पाहू या कोणत्या देशाने जिंकले किती सामने... 

- ऑस्ट्रेलिया 523
- पाकिस्तान 441*
- भारत 440
- वेस्ट इंडिज  372
- श्रीलंका 355
- दक्षिण आफ्रिका  328
- इंग्लड 308
- न्यूझीलंड 295
- झिम्बाब्वे 114
- बांगलादेश  86

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.