१४.५ कोटी रुपयांच्या बोलीसह पुण्याच्या संघात स्टोक्सचा समावेश

आयपीएल २०१७च्या लिलावात आज रायझिंग पुणे सुपरजायंट्सने यंदाच्या मोसमातील सर्वाधिक रुपयांची बोली लावत इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलंय. त्याच्यावर तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. 

Updated: Feb 20, 2017, 10:44 AM IST
१४.५ कोटी रुपयांच्या बोलीसह पुण्याच्या संघात स्टोक्सचा समावेश title=

मुंबई : आयपीएल २०१७च्या लिलावात आज रायझिंग पुणे सुपरजायंट्सने यंदाच्या मोसमातील सर्वाधिक रुपयांची बोली लावत इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलंय. त्याच्यावर तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. 

पुण्याच्या संघाने आपल्या रकमेच्या अर्ध्याहून अधिक रक्कम स्टोक्सला आपल्या संघात घेण्यात खर्च केलीये. बेन स्टोक्सची कामगिरी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात चांगली झाली होती. त्याची भारतातील कामगिरी पाहता पुणे संघाने त्याला खरेदी केलेय. 

पहिल्यांदाच बेन स्टोक्सवर बोली लावण्यात आली आणि त्याने बोलीच्या रकमेचे विक्रमही तोडले. बेन स्टोक्सव्यतिरिक्त गेल्या मोसमात सर्वाधिक बोली मिळवलेल्या पवन नेगीलाही आरसीबी संघाने १ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केली. गेल्या मोसमात दिल्लीने त्याच्यावर तब्बल ८.५ कोटी रुपयांची बोली लावली होती.