सचिन तेंडुलकरने नोएडात खरेदी केला आलिशान फ्लॅट

माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील आलिशान वस्ती असलेल्या ग्रेटर नोएडा येथे फ्लॅट खरेदी केलाय. या फ्लॅटची किंमत १ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. 

Updated: May 13, 2016, 11:26 PM IST
सचिन तेंडुलकरने नोएडात खरेदी केला आलिशान फ्लॅट  title=
संग्रहित

मुंबई : माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील आलिशान वस्ती असलेल्या ग्रेटर नोएडा येथे फ्लॅट खरेदी केलाय. या फ्लॅटची किंमत १ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. 

सचिनचे हे आहेत शेजारी

सचिनने घेतलेला हा नवा फ्लॅट भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी, माजी कर्णधार कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन आणि आर. पी. सिंग यांच्या शेजारी आहे. तसेच बॉलिवूड स्टार मंडळी सुनील शेट्टी, राहुल देव आणि रोहित रॉय यांनी देखील येथे फ्लॅट खरेदी केले आहेत. 

२१ व्या मजल्यावर फ्लॅट

सचिनचा फ्लॅट ‘जेपी गोल्फ कोर्स’मधील क्रिसेंट कोर्ट या उत्तुंग इमारतीत २१ व्या मजल्यावर आहे. जेपी ग्रीनच्या जी-ब्लॉकमधील सीसी ०१-२१०३ क्रमांकाच्या या फ्लॅटचे क्षेत्रफळ ३१५० स्क्वेअर फूट इतके आहे. सहा मोठ्या खोल्या असलेला हा आलिशान फ्लॅट सुखवस्तूंनी सुसज्ज आहे. 

सचिनचा मुंबईतील व्हिला

सचिन मुंबईत वांद्रे येथे राहतो. सचिनचा हा व्हिला ६००० स्क्वेअर फुटांचा असून, याची किंमत ८० कोटी रुपये इतकी आहे. तर पुण्यातही सचिनचे आलिशान घर आहे. सचिनची पत्नी अंजली हिने जवळपास ८ लाख ४० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरून फ्लॅट आपल्या नावावर करण्याबाबतची कायदेशीर कारवाई पूर्ण केली.