शिखर धवन ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय

टीम इंडियाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावरील ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झालाय. शिखरने वर्ल्डकपमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

Updated: Mar 12, 2015, 04:27 PM IST
शिखर धवन ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय title=

हॅमिल्टॉन : टीम इंडियाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावरील ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झालाय. शिखरने वर्ल्डकपमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

वर्ल्डकपमध्ये 2015 मध्ये धवनने धडाकेबाज फलंदाजी केली आहे. मंगळवारी आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात धवनने शतक झळकावले होते तर रोहित शर्माने 64 धावा केल्या होत्या. दुसऱ्या शतकानंतर शिखरची चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे. 

ट्‌विटरवर शिखरवर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. धवननंतर टीम इंडियाचा रोहित शर्माचा क्रमांक लागतो. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला शिखर आणि रोहितने मागे टाकले आहे, अशी माहिती ट्‌विटरने प्रसिद्ध केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.