कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर गोलंदाजांचे वर्चस्व

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पूर्णपणे गोलंदाजांनी गाजवला. दुसऱ्या दिवसाच्या संपूर्ण खेळात दोन्ही संघांतील तब्बल २० गडी बाद झाले.

Updated: Nov 26, 2015, 05:55 PM IST
कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर गोलंदाजांचे वर्चस्व title=

नागपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पूर्णपणे गोलंदाजांनी गाजवला. दुसऱ्या दिवसाच्या संपूर्ण खेळात दोन्ही संघांतील तब्बल २० गडी बाद झाले.

फिरकीपटू आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रभावी मारा करताना दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पाहुण्यांना ७९ धावांत गुंडाळले. अश्विनने पाच आणि जडेजाने चार विकेट घेत पाहुण्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७९ धावांत संपुष्टात आल्यानंतर भारत दुसरा दिवस खेळून काढेल असे वाटले होते. मात्र यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व दिसले ते गोलंदाजांचेच.

आणखी वाचाटीम इंडियानं घडवला इतिहास... अवघ्या ७९ रन्समध्ये द. आफ्रिकेची टीम गारद

भारताने दुसऱ्या डावास सुरुवात केल्यानंतर पाचव्याच षटकांत आफ्रिकेने पहिल धक्का दिला. सलामीवीर शिखर धवनने ३९ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक धावा त्याने केल्या. रोहित शर्माने काही काळ खेळपट्टीवर तग धरण्याचा प्रयत्न केला. मात्र मॉर्केलने त्याला दूर केले. चेतेश्वर पुजाराने ३१ धावा केल्या. इतर सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यात साफ अपयशी ठरल्याने भारताचा दुसरा डाव १७३ धावांत आटोपला. 

दुसरा  दिवस संपण्याच्या अखेरीस आफ्रिकेने फलंदाजीस सुरवात केली असून त्यांचे ३२ धावांत दोन गडी बाद झालेत. सामन्याचे तीन दिवस अद्याप शिल्लक असून त्यांना विजयासाठी २७८ धावांची गरज आहे. त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.