...लग्नादरम्यान झालेली चूक अशी सुधारली सुरेश रैनानं!

क्रिकेटर सुरेश रैना लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या मामाच्या गावाला दाखल झाला होता तो लग्नात झालेली आपली चूक सुधारण्यासाठी...

Updated: Sep 12, 2015, 06:28 PM IST
...लग्नादरम्यान झालेली चूक अशी सुधारली सुरेश रैनानं! title=

पठानकोट : क्रिकेटर सुरेश रैना लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या मामाच्या गावाला दाखल झाला होता तो लग्नात झालेली आपली चूक सुधारण्यासाठी...

वचनपूर्ती करण्यासाठी सुरेश रैना आपल्या पत्नीसोबत पठानकोटनजिक असलेल्या सूरजपूर गावात दाखल झाला होता. यावेळी, त्याचे आई-वडीलही त्याच्यासोबत होते. यावेळी, सर्वात जास्त आनंदी दिसत होती ती सुरेशची आजी... 

त्याचं झालं असं, की लग्नाच्या घाई-गरबडीत सुरेश रैना आपल्या मामा-मामीला लग्नाचं आमंत्रण द्यायलाच विसरून गेला होता. त्यामुळे त्याचे मामा-मामी त्याच्यावर नाराज झाले होते. 

३ एप्रिल रोजी रैना आणि प्रियांकाचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात झाला होता. पण, या लग्नासाठी सुरेशचे मामा शीशपाल आणि त्यांची पत्नी मात्र गैरहजर राहिले. कारण, त्यांना या लग्नाचं आमंत्रणच मिळालं नव्हतं.

सुरेशच्या कुटुंबीयांच्या ही गोष्ट जेव्हा ध्यानात आली तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर सुरेशनं आपल्या मामा-मामीला आपल्या पत्नीसोबत त्यांच्या घरी येण्याचं वचन दिलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.