ढाका : तमीम इक्बाल आणि विकेटकिपर मुशफिकर रहीम यांच्या शतकांच्या जोरावर उभा केलेला ३२९ धावांचा डोंगर पाकिस्तानला पेलता आला नाही. पाकिस्तानचा संघ ४५.२ षटकात ऑलऑऊट झाली. पाकने २५० धावा केल्या आणि ७९ रन्सने पराभव पत्करला. १६ वर्षानंतर पाकला धूळ चारल्यानंतर बांग्लादेशमध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
पाकिस्तानच्या शेवटच्या सहा विकेट केवळ ३३ धावांत बांग्लादेशच्या गोलंदाजीने घेतल्या. बांग्लादेशला कसोटीचा दर्जा मिळाल्यानंतर वन डेमध्ये चकदार कामगिरी केली. पाकिस्तानबरोबरच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धडा शिकवला.
तीन दिवसीय वन डे मालिकेत बांग्लादेशने १-० ने आघाडी घेतली आहे. बांग्लादेशने १९९९च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरविले होते. बांग्लादेशने पाकिस्तानवर सुरुवातीपासून दबाब ठेवला. दरम्यान, अजहर आणि सोहेलने तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी केली. बांग्लादेशकडून तास्किन अहमदने ४२ धावांच्या बदल्यात ३ विकेट घेतल्या.
सलामी फलंदाज तमीम इक्बाल आणि विकेटकिकपर फलंदाज मुशफिकर रहीम यांच्या शतकांच्या जोरावर बांग्लादेशने पाकिस्तान विरोधात पहिल्या वनडेमध्ये सहा विकेट ३२९ धावांचा डोंगर उभा केला होता.
तमीमने १३५ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकार मारत १३२ धावा ठोकल्यात. तर रहीमने ७७ चेंडूत १०६ धावा धडाकेबाज खेळीने केल्यात. त्याने यामध्ये १३ चौकार आणि २ उत्तुंग षटकार मारलेत. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची विक्रमी भागिदारी केली. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वन डेमधील बांग्लादेशची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
बांग्लादेशने पहिल्यांदा तीन विकेटच्या बदल्यात ३२६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरोधात गेल्यावर्षी मार्च महिन्यात हा रिकॉर्ड केला होता. हा रेकॉर्ड बांग्लादेशने मोडलाय. आता ३२९ रन्स केल्यात.
राजिन सालेह आणि हबीबूल बशर यांनी केनिया विरोधात २००६मध्ये १७५ धावांची भागिदारी केली होती. या रेकॉर्डही तोडण्यात आलाय.
बांग्लादेशचा सौम्या सरकार (२०) आणि महमुदुल्लाह (५) हे दोघे झटपट बाद झालेत. त्यानंतर आलेल्या तमीम आणि रहीम यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोप चोप चोपले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.