हरारे : टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
झिम्बाबेविरोधात आपला पहिलाच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या लोकेश राहुलने शतक करत रेकॉर्ड केलाय. लोकेश राहुलने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाम्बेचा ९ गडी राखत पराभव केला.
झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत १६८ धावा केल्या होत्या. १६९ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने ४२.३ ओव्हर्समध्येच विजय संपादन केला. तीन सामन्यांचा या मालिकेत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतलेय.
लोकेश राहुलने जेव्हा ८७ धावा केल्या तेव्हा त्याने पदापर्पणाच्या सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा रॉबिन उथ्थपाचा रेकॉर्ड तोडला. रॉबिन उथ्थपाने २००६ मध्ये इंग्लंडविरोधात खेळताना रेकॉर्ड केला होता.