close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राफेल नदालला पराभवाचा धक्का

मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय. डॉमिनिकनं नदालला 6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूतकेलंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 20, 2017, 08:22 AM IST
राफेल नदालला पराभवाचा धक्का

रोम : मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय. डॉमिनिकनं नदालला 6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूतकेलंय. 

जागतिक क्रमवारीत नदाल चौथ्या तर डॉमिनिक सातव्या क्रमांकावर आहे. याआधी हे दोघं पाचवेळा आमनेसामने आले होते. त्यात चार वेळा नदालने तेर एकदा डॉमिनिकनं बाजी मारली होती. 

यावर्षीच्या डॉमिनिकविरुद्धच्या दोन्ही लढतीत नदाल सर्वश्रेष्ठ ठरला होता. तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी नदाल उत्सुक होता. मात्र यावेळी डॉमिनिकनं बाजी मारलीय.