ट्विटरवर तेंडुलकरच्या पुढे गेला कोहली

 क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणारा भारतीय खेळाडू बनला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकून त्याने क्रमांक एक पटकावला आहे. तेंडुलकरने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर एक वर्षानंतरही या यादीत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. 

Updated: Dec 24, 2014, 07:42 AM IST
ट्विटरवर तेंडुलकरच्या पुढे गेला कोहली title=

मुंबई :  क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणारा भारतीय खेळाडू बनला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकून त्याने क्रमांक एक पटकावला आहे. तेंडुलकरने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर एक वर्षानंतरही या यादीत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. 

कोहली एकूण ४८ लाख ७० हजार १९० प्रशंसकांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तेंडुलकरला ४८ लाख ६९ हजार ८४९ लोक फॉलो करतात. गेल्या वर्षी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर ट्विटरवर काही काळासाठी सचिन पहिल्या क्रमांकावर होता. पण कोहलीने ऑक्टोबरमध्ये ४० लाख फॉलोअर्सची संख्या पार केली होती. ती डिसेंबरमध्ये आठ लाखांनी वाढून ४८ लाख ७० हजार झाली आहे. 
या यादीत तेंडुलकरनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३३ लाख २७ हजार ३३ फॉलोअर्ससह तिसऱ्या स्थानावरआहे. वीरेंद्र सेहवाग (३१, ८०, ०८१), युवराज सिंग (२७, २३, ०९०) आणि सुरेश रैना (२६, १७, ८२८) यांचा क्रमांक लागतो. 

खेळाडूंच्या यादीत प्रथम दहा पैकी ९ क्रिकेटर आहेत सातव्या क्रमांकावर स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झा ही आहे. त्यानंतर झहीर खान, गौतम गंभीर आणि रोहित शर्माचा क्रमांक लागतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.