विराटच्या कृतीवर सुनील गावस्कर नाराज

भारतीय संघाने चौथ्याच दिवशी ८ विकेट्सने सामना जिंकला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणि संपूर्ण संघाने विजय सेलिब्रेट केला. पण आक्रमकतेमुळे ओळखला जाणारा विराट कोहली आज पुन्हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे टीकेचा धनी बनला. कसोटीच्या दुसऱया दिवशी बेन स्टोक्स आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करतांना कोहलीने टीप्पणी केली. विराटच्या या कृतीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली.

Updated: Nov 29, 2016, 06:34 PM IST
विराटच्या कृतीवर सुनील गावस्कर नाराज title=

मोहाली : भारतीय संघाने चौथ्याच दिवशी ८ विकेट्सने सामना जिंकला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणि संपूर्ण संघाने विजय सेलिब्रेट केला. पण आक्रमकतेमुळे ओळखला जाणारा विराट कोहली आज पुन्हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे टीकेचा धनी बनला. कसोटीच्या दुसऱया दिवशी बेन स्टोक्स आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करतांना कोहलीने टीप्पणी केली. विराटच्या या कृतीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली.

क्रिकेट डॉट कॉमने दिलेल्या बातमीनुसार विराटची ही कृती योग्य नसल्याचं गावस्कर यांनी म्हटलं आहे. कोणताही खेळाडू आऊट झाल्यानंतर परतत असतांना त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोहलीने बेन स्टोक्सवर टीप्पणी केल्यानंतर पुढच्या डावात विराट कोहलीला बाद केल्यानंतर बेन स्टोक्स यानेही आपल्या तोंडावर हात ठेवून टीप्पणी केली होती. त्यानंतर विराटनेही तोंडावर बोट ठेवून टीप्पणी केली. त्यामुळे विराटला एक जबाबदार खेळाडू म्हणून मैदानावर शांत राहण्याचा सल्ला सुनील गावस्करांनी दिला आहे.