सचिनपेक्षाही दुपटीने कमावतो विराट, सलमान, शाहरुखलाही टाकले मागे

प्रसिद्ध मासिक फोर्ब्सने २०१६ साली लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई कऱणाऱ्यांची यादी जाहीर केलीये. या लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कोहली देशातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी बनलाय.

Updated: Dec 24, 2016, 09:21 AM IST
सचिनपेक्षाही दुपटीने कमावतो विराट, सलमान, शाहरुखलाही टाकले मागे title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध मासिक फोर्ब्सने २०१६ साली लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई कऱणाऱ्यांची यादी जाहीर केलीये. या लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कोहली देशातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी बनलाय.

यात त्याने सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या दिग्गजांना मागे टाकलंय. लोकप्रियतेत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खान, तिसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान, भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी चौथ्या क्रमाकावर तर अमिताभ बच्चन पाचव्या स्थानी आहेत. 

तसेच कोहली देशातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलाय. कोहलीची वार्षिक कमाई १३४.४ कोटी रुपये इतकी आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी एमएस धोनी. त्याची कमाई १२२.४८ कोटी रुपये आहे. 

सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर युवराज सिंहचा नंबर लागतो.