विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना कोण आहे सरस...

Updated: Feb 4, 2016, 06:09 PM IST

বিরাট সচিনের থেকে এগিয়ে, দেখুন পরিসংখ্যান

मुंबई :  सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता म्हटलं जातं. पण आपला विक्रम विराट  मोडू शकतो हे स्वतः क्रिकेटच्या देवानेच भाकीत व्यक्त करून ठेवले आहे. 

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना होऊ शकत नाही. तरीही आपण आकडेवारीकडे नजर टाकली असता. सध्या विराट कोहली याने ४१ कसोटी आणि १७१ वन डे सामाने खेळले आहेत. तर सचिन आपल्या कारकिर्दीत ४१ कसोटी आणि १७१ वन डे खेळला होता. त्यावेळी त्याची स्थिती काय होती हे पाहण्याचा हा प्रयत्न आहे. 

कसोटीत सचिन सरस असून वन डे क्रिकेटमध्ये सचिनच्या विक्रमाच्या दिशेने विराट वेगाने वाटचाल करतो आहे. 

पाहू या कोण कोणत्या सरस आकडेवारीत

कसोटीत सचिन
विराटशी तुलना करता सचिन सरासरीत सरस आहे. ४१ सामन्यात त्याने ६० इनिंगमध्ये बॅटिंग केली होती. त्यात ७ वेळा नाबाद राहिला होता.त्यात त्याने ५४.९२ च्या सरासरीने २९११ धावा केल्या होत्या. १७९ ही त्याची सर्वाधिक धाव संख्या होती. यात त्याने १० शतक आणि १४ अर्धशतक केले आहेत.

कसोटीत विराट

सचिनने ४१ कसोटी खेळला होता त्यावेळी त्याने ७२ इनिंगमध्ये बॅटिंग केली होती. त्यात ४ वेळा नाबाद राहिला होता. त्यात त्याने ४४.०२ च्या सरासरीने २९९४ धावा केल्या होत्या. १६९ ही त्याची सर्वाधिक धाव संख्या होती. यात त्याने ११ शतक आणि १२ अर्धशतक केले होते. 

वन डेमध्ये सचिन 
सचिनने १७१ वन डे खेळला होता त्यावेळी त्याने १६६ इनिंगमध्ये बॅटिंग केली होती. त्यात १६ वेळा नाबाद राहिला होता. त्यात त्याने ३८.८५ च्या सरासरीने ५८२८ धावा केल्या होत्या. १३७ ही त्याची सर्वाधिक धाव संख्या होती. यात त्याने १२ शतक आणि ३६ अर्धशतक केले होते. 

वन डेमध्ये विराट 

सचिनने १७१ वन डे खेळला होता त्यावेळी त्याने १६३ इनिंगमध्ये बॅटिंग केली होती. त्यात २३ वेळा नाबाद राहिला होता. त्यात त्याने ५१.५१च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या होत्या. १८३ ही त्याची सर्वाधिक धाव संख्या होती. यात त्याने २५ शतक आणि ३६ अर्धशतक केले होते.