मुंबई : विश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला संधी देताना युवीला डावलण्यात आले आहे.
वर्ल्ड कप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे यंग आणि नव्या दमाच्या प्लेअर्सची टीम वर्ल्ड कपसाठी घोषित करण्यात आली आहे. गेल्या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील केवळ 4 प्लेअर्सचाच यंदाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला असून युवराज सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
अक्षर पटेलचा आणि स्टुअर्ट बिन्नी या दोन युवा प्लेअर्सचा टीममध्ये ऑल राऊंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. उमेश यादवचाही फास्ट बॉलर आणि अंबाती रायडूचा अतिरिक्त विकेटकिपर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
ओपनिंगला शिखर धवन आणि रोहित शर्मा असून अजिंक्य रहाणेला ओपनिंग आणि मिडल ऑर्डर अशा दोन स्थानांवर खेळवण्यात येऊ शकतं. मिडल ऑर्डरला विराट कोहली, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश असून आर.अश्विन स्पिनिंगची जबाबदारी सांभाळेल. तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी ही ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीवर असेल.
टीम इंडिया
- सुरेश रैना
- रवींद्र जडेजा
- विराट कोहली
- अक्षर पाटेल
- आर अश्विन
- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार)
- स्टुअर्ट बिन्नी
- अजिंक्य रहाणे
- अंबाती रायडू
- शिखर धवन
- भूवनेश्वर कुमार
- मोहम्मद शमी
- उमेद यावद
- रोहित शर्मा
मागिल वर्ल्डकपमधील चार जणांना २०१५ च्या टीममध्ये पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर युवराज सिंग, झहीर खान, पियुष चावला, गौतम गंभीर, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, यूसुफ पठाण, वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा यांचा विचार नाही. तर युवीचा २०११ च्या वर्ल्डकपसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.