टी-२०चा रेकॉर्ड, एका ओव्हरमध्ये बनविले ३९ रन्स

बडोदाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कमालच केली.

Updated: Jan 12, 2016, 09:19 AM IST
टी-२०चा रेकॉर्ड, एका ओव्हरमध्ये बनविले ३९ रन्स title=

नवी दिल्ली : बडोद्याचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कमाल केली. त्याने दिल्लीच्या एका गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. हार्दिकने एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारत ३४ रन्स ठोकले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही हार्दिकला भारताच्या टी-२० संघात जागा मिळाली आहे. या ओवरमध्ये एकूण ३९ रन्स बनले. ज्यामध्ये हार्दिकचे ५ छक्के आणि एका वाईड बॉलसह अन्य ४ रन्स गोलंदाज आकाश सूदनने दिले आहे. ३९ रन देण्याचा रेकॉर्ड बनला आहे. 

गॅरी सोबर्स (1968), रवी शास्त्री (1985), हर्शेल गिब्स (2007), युवराज सिंग (2007) आणि अॅलेक्स हेल्स (2015) यांच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे. फक्त एका सिक्सने हा रेकॉर्ड हार्दिकच्या नावे होऊ शकला नाही.