जंटलमन्स गेमला जेव्हा लागला कलंक

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेली वनडे मॅच ही क्रिकेटमधल्या लाजीरवाण्या मॅचपैकी एक म्हणून गणली जाईल.

Updated: Apr 14, 2016, 04:28 PM IST
जंटलमन्स गेमला जेव्हा लागला कलंक title=

मुंबई: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेली वनडे मॅच ही क्रिकेटमधल्या लाजीरवाण्या मॅचपैकी एक म्हणून गणली जाईल. क्रिकेट या जंटलमन्स गेमला लागलेला कलंक म्हणून या मॅचकडे पाहिलं जाईल. 

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३० ओव्हरमध्ये १७४ रन्स हव्या होत्या. शेवटच्या बॉलला ४ रनची आवश्यकता असताना स्टीव्ह वॉनं बॉल मिड विकेटला मारला. 

ऑस्ट्रेलियानं या शेवटच्या बॉलला तीन रन काढल्या असत्या तर ही मॅच टाय झाली असती, पण स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक थेट मैदानात आले, आणि पीचवरच उभे राहिले. 

इतकच नाही तर त्यांनी पीचवरचे स्टंप आणि स्टीव्ह वॉच्या हातातली बॅटही घेतली. प्रेक्षकांच्या या वागणुकीमुळे स्टीव्ह वॉ आणि वेस्ट इंडिजचे खेळाडूही घाबरले होते.