श्रीलंकेचा सुपर विजय

कोलंबो येथे सुरू असलेल्या विश्वोकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर एटच्या निर्णायक टप्प्याला धडाकेबाज सुरूवात झाली. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामना टाय झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 28, 2012, 10:21 AM IST

www.24taas.com, कोलंबो
कोलंबो येथे सुरू असलेल्या विश्वोकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर एटच्या निर्णायक टप्प्याला धडाकेबाज सुरूवात झाली. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामना टाय झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.
लसिथ मालिंगाच्या गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने यजमान न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून सुपर एट फेरीचा प्रारंभ शानदार केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७४ धावा फटकावल्या आणि लक्ष्याचा पाठलाग करणार्याश यजमान श्रीलंकेचा डाव ६ बाद १७४ धावांत रोखला.
सुपर ओव्हरमध्ये लंकेने जयवर्धनेच्या मोबदल्यात १४ धावा केल्या. पण न्यूझीलंडच्या ब्रॅडॉन मॅककुलम आणि मार्टिन गुप्टिल यांना मालिंगाने ७ धावाच काढू दिल्या.
१७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिलकरत्ने दिलशान (७६ धावा, ५३ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) आणि माहेला जयवर्धने (४४ धावा, २६ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार) यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन दिली. श्रीलंकेला अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. साऊदीच्या या षटकात थिरिमाने व मॅथ्यूज यांनी ७ धावा वसूल केल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना थिरिमाने धावबाद झाल्याने सामना ‘टाय’ झाला.
धावफलक
न्यूझीलंड – २० षटकांत ७ बाद १७४ (रॉब निकोल ५८-४० चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, मार्टिन गुप्टील ३८-३० चेंडू, ६ चौकार, ब्रेंडन मॅक्‌लम २५-१६ चेंडू, २ षटकार, रॉस टेलर २३-१५ चेंडू, २ चौकार, जेकब ओरम ६, नुवान कुलशेखरा २-३३, लसित मलिंगा १-३०, अजंता मेंडीस ४-०-४८-१, अकिला परेरा २-३२)
श्रीलंका- २०षटकांत ६बाद १७४ (माहेला जयवर्धने ४४-२६ चेंडू, ३ चौकार, ३षटकार, तिलकरत्ने दिल्शान ७६-५३ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, कुमार संगकारा २१-१४ चेंडू, ४ चौकार, जीवन मेंडीस८, अँजेलो मॅथ्यूज नाबाद १२, थिसारा परेरा ५-३ चेंडू, १ चौकार, लाहिरू थिरीमन्ने ५-४चेंडू, १ चौकार, टिम साऊदी ४-०-४४-०, जेकब ओरम १-२६, डॅनिअल व्हिटोरी ४-०-२९-०, जेम्स फ्रॅंकलिन ४-०-३४-२).