भारत-पाकिस्तानची पुन्हा एकदा धडक निश्चित!

पल्लीकल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश मॅचमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशचा ८ विकेट्स आणि ८ बॉल्स राखून दणदणीत पराभव करताना दिमाखात सुपर-८ फेरी गाठलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 26, 2012, 01:32 PM IST

www.24taas.com, कोलंबो
पल्लीकल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश मॅचमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशचा ८ विकेट्स आणि ८ बॉल्स राखून दणदणीत पराभव करताना दिमाखात सुपर-८ फेरी गाठलीय.
३६ बॉल्समध्ये ९ फोर आणि ३ सिक्सर्सच्या मदतीने ७२ रन्सची खेळी करणारा पाकिस्तानी ओपनिंग बॅट्समन इम्रान नाझीरची ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराकरता निवड करण्यात आली. पहिल्यांदा बॅटिंग करताना बांग्लादेशने शाकीब अल हसनच्या धमाकेदार ८४ रन्सच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानपुढे २० ओव्हर्समध्ये १७६ रन्संच टार्गेट ठेवलं. टार्गेटचा पाठलाग करण्याकरता मैदानात उतरलेल्या मोहम्मद हाफिज आणि नाझीर जोडीने पाकिस्तानला १२४ रन्सची दमदार ओपनिंग करून दिली.
पाकिस्तानच्या या विजयामुळे पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान ३० सप्टेंबर रोजी आमने-सामने उभे ठाकणार आहेत.