www.24taas.com, कोंलबो
टी-२० वर्ल्डकप श्रीलंकेत सुरू आहे. मात्र भारतीय टीमचं काहीही खरं नाही. कारण टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच चिंतेत पडला आहे. श्रीलंकेत टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियाला निकृष्ट जेवण मिळत आहे. त्यामुळे युवराज सिंग आणि सुरेश रैना हे आजारी पडले आहेत.
युवराजच्या घशाची समस्या जाणवत आहे. तर, रैनाचंही पोट खराब झालं आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंनी शुक्रवारी सरावात सहभाग घेतला नाही. या दोन्ही खेळाडूही अतिमहत्त्वाचे असल्याने कर्णधार धोनीचे टेन्शन वाढले आहे. याआधी स्टेडियमवर दिले जाणारे जेवण हे खाण्यालायक नसल्याने भारतीय क्रिकेटपटूंनी तक्रार केली होती.
टीम इंडियाच्या तक्रारीची दखल घेत क्रिकेटपटूंसाठी दूसर्या हॉटेलमधून जेवण मागविले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य देशातील क्रिकेटपटूंनी देखील स्टेडिअमवरील जेवणामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.