कांगारुंना विंडीजने ७४ धावांनी पिटाळले

आयसीसी ट्वेंटी-20 विश्व चषकाच्या दुसर्याा उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने नाबाद ७५ धावांची तडाखेबंद खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचा डोंगर रचला आहे. वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजीनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 5, 2012, 10:41 PM IST

www.24taas.com, कोलंबो
आयसीसी ट्वेंटी-20 विश्व चषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पिटाळत त्यांचा ७४ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडीजच्या २०६ टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १३१ धावांमध्ये गारद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार बेलीने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्यानंतर कोणताही खेळाडू २० धावांचा आकडा गाठू शकला नाही. वेस्ट इंडीजकडून रवि रामपॉलने तीन, बद्री, सुनिल नारायण, आणि किरॉन पोलार्ड यांनी दोन विकेट घेतल्या.
आता फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा सामना यजनाम श्रीलंकेशी होणार आहे.

यापूर्वी पहिल्या डावात वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने नाबाद ७५ धावांची तडाखेबंद खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचा डोंगर रचला. वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजीनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.
वेस्ट इंडिजकडून क्रिस गेल ४१ चेंडूत ६ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ७५ धावा केल्या. त्याला किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांनी चांगली साथ दिली. पोलार्डने १५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. तर ड्वेन ब्राव्होने ३१ चेंडून ३ षटकार आणि एका चौकारासह ३७ धावा केल्या. सॅम्युअल्सने २६ तर चार्ल्सने १० धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने दोन तर स्टार्क आणि डॉरेथी याने प्रत्येकी १ विकेट घेतली.

वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.