www.24taas.com, ह्युस्टन
भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने आंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय ध्वज फडकावून सुनीताने भारतीयांना ६६व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंतराळात अशा पद्धतीने पहिल्यांदाच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.
“१५ ऑगस्टनिमित्त भारताला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... भारत हा खूप सुंदर देश आहे आणि मी या देशाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे” असा संदेशही सुनीताने अंतराळयानातून पाठवला आहे. आपल्या कतृत्वाने भारतीय ध्वजाला सुनीताने यापूर्वीच उंचावर नेले आहे. मात्र आज अंतराळ स्थानकावर ध्वजारोहण करून सुनीताने भारतीयांची मनं पुन्हा जिंकली आहेत
मी अर्धी भारतीय आहे. माझे वडील गुजराती आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरेची मला चांगलीच जाण आहे. मला या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग बनल्याचा खूप अभिमान वाटतोय. असं म्हणत सुनीता विल्यम्सने भारतीय ध्वज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचा झेंडा फडकावला. १५ ऑगस्टचं महत्व लक्षात ठेवून सुनीताने अंतराळात झेपावण्यापूर्वीच भारतीय ध्वज आपल्यासोबत घेतला होता.