मुंबई : व्हॉट्स अॅपवर अनेक पोस्ट या आपल्याला आल्या की आपण त्या पुढे इतर मित्रांना पाठवत असतो. पण कदाचित तुम्हाला माहित या मधील अनेक पोस्ट या फेक असतात. अशीच एक पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपवर फिरते.
डोंबिवलीत जेनेरिक औषधांचं दुकान उघडलं असून तेथे कमी किंमतीत औषधं मिळतील असा मॅसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरतोय. पण प्रत्यक्षात असं काही नाही. त्या मॅसेज मध्ये ज्या मनीष भानूशाली यांचं नाव त्यांचं म्हणणं आहे की, 'माझ्याकडे असे कोणत्याही प्रकारचे स्वस्तात औषधं मिळत नाही.'
मनीष भानुशाली यांना 1 वर्षापासून महाराष्ट्र भरातून फोन येत आहेत पण ते कोणालाही फार नम्रपणे समजावून सांगतात की हा मॅसेज चुकीचा आहे आणि माझ्याकडे असे कोणतेही जेनेरीक औषधं मिळत नाही.
'कमी दरात औषध मिळावी यासाठी गरजूच लोक मला फोन करतात. त्यामुळे मी त्यांना खूप नम्रपणे समजावून सांगतो.' असं मनीष भानुशाली यांचं म्हणणं आहे.