www.24taas.com, न्यूयॉर्क
फेसबुकच्या नव्या मोबाईल ऍप्लिकेशनमुळे थेट आपल्या फ्रेंड्सशी बोलता येईल आणि तेही मोफत. फेसबुकनं हे नवं ऍप्लिकेशन कॅनडात लॉन्च केलंय. या वर्षभरात ते जगभऱात सर्वत्र उपलब्ध होईल.
ही सुविधा सुरू झाल्यानंतर फेसबुकमध्ये `कॉल ए फ्रेंड` असं एक ऍप्लिकेशन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन असलेल्या फ्रेंड्सची यादी दिसेल आणि ज्याच्याशी बोलायचं असेल, त्याला कॉल करता येईल. तुमचा इंटरनेट स्पीड जेवढा जास्त, तितका आवाज सुस्पष्ट येईल.
यामुळे जगभरातल्या मित्रांशी तुम्हाला केवळ इंटरनेट डेटा यूसेजच्या दरात संभाषण करता येऊ शकेल. अनलिमिटेड प्लॅन असेल, तर तुमचा कॉल चक्क मोफत होईल. यामध्ये कॉन्फरन्स कॉलचीही सुविधा असल्यामुळे एकाच वेळी 4 ते 6 `बडीज्`शी तुम्हाला बोलता येईल.