नकोशा SMSपासून आता सुटका

सतत येणाऱ्या नको असलेल्य़ा एसएमएसेसपासून मोबाइल ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण यासाठी ट्रायने नव्या गाइडलाइन्स दिल्या आहेत. हे ऍक्टिवेट करण्यासाठी खाली दिलेले उपाय करु शकता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सतत येणाऱ्या नको असलेल्य़ा एसएमएसेसपासून मोबाइल ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण यासाठी ट्रायने नव्या गाइडलाइन्स दिल्या आहेत. हे ऍक्टिवेट करण्यासाठी खाली दिलेले उपाय करु शकता.
१९०९ या नंबरवर कॉल करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. या नंबरवर तुमची ततक्रार नोंदवली जाईल. तसंच नको असणारे एसएमएस बंद करण्यासाठी १९०९ वर नंबर आणि तारीख टाइप करून फॉरवर्ड करावा. एका नंबरची दोनवेळा तक्रार मिळाल्यावर हा नंबर ट्राय कट करून टाकणार आहे.

सगळ्याच नको असलेल्या एसएमएसेसपासून मुक्ती मिळवण्यासाठी START 0 असा मॅसेज करावा. तर काही प्रमाणावर नकोशा एसएमएसेसपासून सुटका मिळवण्यासाठी केवळ START एवढाच मॅसेज करावा.
दूरसंचार मंत्री असलेल्या कपिल सिबल यांनाही नकोसे मॅसेजेस डोकेदुखी ठरल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांनी ‘ट्राय’कडेच या संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.