फेसबुकमुळे वाढतोय नातेसंबंधांमध्ये तणाव!

सध्या तरूणांचा आवडता कट्टा म्हणजे फेसबुक. जरी फेसबुक कितीही फेक असले तरीही या कट्ट्यावर बसण्याचा मोह काही आवरता येत नाही. पण रिलेशनशिपमध्ये असणा-यांनो सावधान...हा कट्टा तुमच्या रिलेशनशपला धोका होऊ शकतो

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 9, 2013, 06:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
सध्या तरूणांचा आवडता कट्टा म्हणजे फेसबुक. जरी फेसबुक कितीही फेक असले तरीही या कट्ट्यावर बसण्याचा मोह काही आवरता येत नाही. पण रिलेशनशिपमध्ये असणा-यांनो सावधान...हा कट्टा तुमच्या रिलेशनशपला धोका होऊ शकतो
फेसबुक आणि इतर नेटवर्किंग साइटच्या केलेल्या संशोधनानुसार असे कळले आहे की सोशल नेटवर्किंग साईटच्या अधिक वापरामुळे रिलेशनशिपमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो.अमेरिकतील मिसौरी यूनिवर्सिटीचे डॉ. रसेल क्लेटन यांनी १८ ते ८२ वयोगटातील फेसबुक युझरचं सर्वेक्षण केलं. लोकांना विचारण्यात आलं की ते किती वेळ या सोशल नेटवर्किंगचा साइटचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांच्या जोडीदारांशी कितीवेळा भांडण होतं.
रिसर्चमधून लक्षात आलं, की अनेक जण फेसबुकवर जितकं स्वतःचं फ्रोफाइल पाहातात, तितकाच वेळ पल्या जोडीदाराचं प्रोफाइलही पाहातात. अशा पद्धतीने ते एक प्रकारे आपल्या जोडीदारावर ‘वॉच’ ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांसारख्या घटनांमुळे जोडप्यांमध्ये वाद उद्भवतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.