www.24taas.com, वृत्तसंस्था, ईस्ट पालो अल्टो
फेसबुक या लोकप्रिय सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी सिलिकॉन व्हॅलीतील सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्सची आर्थिक मदत दान म्हणून दिली आहे.
कॅलिफोर्नियातील पूर्व पालो अल्टो येथे मार्क झुकेरबर्ग यांनी रेंझवुड फॅमिली हेल्थ सेंटरसाठी मदतीची घोषणा केली. या आरोग्य केंद्रासाठी २.९ कोटी डॉलर्स खर्च येणार असल्याचे समजल्यावर झुकेरबर्ग यांनी ही मदत दिलेय. या आरोग्य केंद्राची नवीन इमारत पुढील वर्षात पूर्ण होईल.
२९ वर्षीय मार्क याने फेसबुकची सुरूवात केल्यानंतर अल्पावधीत जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत जाऊन बसला आहे. १० वर्षांपूर्वी हॉवर्ड विद्यापीठात त्याने ऑनलाईन सोशल नेटवर्कची सुरूवात केली होती. त्याची संपत्ती १९ अब्ज डॉलर्स इतकी असून त्यातील काही भाग त्याने मदत आणि देणग्या देण्यासाठी उपयोगात आणला आहे. गतवर्षीही त्याने आणि पत्नी प्रिसिला यांनी कम्युनिटी फौंडेशनच्या मदतीसाठी फेसबुकचे ९० लाख डॉलर्स किमतीचे समभाग दिलेत.
कंपनीसाठी मदत व्हावी म्हणून याआधी मार्क झुकेरबर्ग यांने २०१३ मध्ये केवळ १ डॉलर वेतनावर काम करण्याचा निर्णय घेतला. याबरोबर बोनस आणि शेअरही घेतलेले नाहीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.