www.24taas.com, बीजिंग
भिकारी हे बऱ्याचदा त्रासदायक ठरतात. अनेक वेळेस त्यांचा लहान मुले, स्त्रिया यांना त्रास होतो. त्यामुळे आता भिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. शांघाई शहर पोलिसांनी भिकाऱ्यांची ऑनलाईल यादी प्रकाशित केली आहे.
मेट्रो रेल्वेगाड्यांमध्ये भिक मागतांना त्यांना पकडता यावे या साठी फेसबुकच्या माध्यमातुन तेथे कवायत सुरू झाली आहे. पोलिसांनी भिका-यांची सुचना देण्यासाठी मेट्रोत प्रवास करणा-यांना एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
पोलिस अधिका-यांनी भिका-यांना पकडण्यासाठी संदेश प्राप्त झाल्यापासून पाच मिनिटात घटना स्थळी पोहचण्याचा दावा केला आहे.