www.24taas.com, मुंबई
‘स्प्लेन्डर’ला चॅलेंज करण्यासाठी होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर्स इंडिया (एचएमएसआय) एक नवीन बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. ही बाईक इतर १०० सीसी मोटरसायकल्सना टक्कर देणारी असेल.
बाजारात लीडरशिप मिळवण्यासाठी होंडा ही नवी बाईक लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे हीरो मोटोकॉर्पला म्हणजे आपल्या जुन्या भागीदाराला ही बाईक टफ फाईट ठरणार आहे. येत्या काही महिन्यांत ही बाईक बाजारात दाखल होईल. या बाईकचं सध्या कोडनेम ‘के २३’ असं ठेवण्यात आलंय. होंडानं आआझी १०० सीसी सेगमेंटमध्ये ड्रीम सीरिज लॉन्च केली होती. ‘ड्रीम युगा’च्या प्लॅटफॉर्मवर या बाईकची निर्मिती करण्यात आलीय.
‘कंपनीच्या १०० सीसी मोटारसायकलचं हे नवं आणि विकसित रुप असेल. परंतू स्प्लेंडरला टक्कर देण्यासाठी या बाईकची किंमत कमीत कमी असेल. या प्रोडक्टमध्ये पुन्हा एकदा कंपनीचा जोर मायलेजवरच असेल’अशी माहिती कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलीय. २०१४ च्या आर्थिक वर्षात या बाईकचे ६ लाख यूनिट विकले जातील, अशी अपेक्षा कंपनीला आहे.