हुआवेई असेंडचा पातळ एन्ड्रॉईड स्मार्टफोन

हुआवेईने सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. एन्ड्रॉईड मोबाईल असेंड पी ६ हा जगातील सर्वात पातळ फोन बाजारात आणलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2013, 04:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हुआवेईने सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. एन्ड्रॉईड मोबाईल असेंड पी ६ हा जगातील सर्वात पातळ फोन बाजारात आणलाय.
हुआवेई असेंड पी ६ हा ६.१८ मीमी मोठा तर याची स्क्रिन ४.७ डिस्प्ले आहे. हा मोबाईल तीन रंगात आहे. काळा, पांढरा आणि गुलाबी अशा रंगात असणार आहे. चीनच्या टेलिकम्युनिकेन्शस कंपनी हुआवेईचा हा मोबाईल अॅप्पलच्या आयफोन-५ आणि अल्काटेलचा वन आयडियल अल्ट्रा यांच्यापेक्षा कमी जाडीचा आहे. या दोन्ही फोनपेक्षा याचे वजन जास्त आहे. बॅटरीसह या मोबाईलचे वजन १२० ग्रॅम आहे.
१.५ जीएचझेची कोर प्रोसेसर वापरून यांची मेमरी ८ जीबीपर्यंत वाढवता येते. त्यामुळे मोबाईलची मेमरी ३२ जीबीपर्यंत होते. हा फोन एन्ड्रॉईडच्या ४.२.२ जेलीबिन ऑपरेटिंग सिस्ट०मवर चालतो. या फोनला पुढचा ५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा फोटो काढू शकता.

या मोबाईलमध्ये २ जीबी रॅम आहे. यामध्ये ८ मेगापिक्सेल ऑटोफोकस कॅमेराही आहे. कनेक्टिव्हीटीसाठी DLNA, ब्लुऑटूथ आणि वायफाय सारखे डाइरेक्टक फिचर आहे. २००० एमएएचची बॅटरी आहे. कंपनी दावा केला आहे की, पॉवर टेक्नीकलच्या माध्यमातून या फोनच्या बॅटरीची क्षमता ३० टक्के वाढवू शकतो.
बाजारामध्ये सॅमसंग आणि अॅप्पल यांच्या स्मार्टफोनने दबदबा निर्माण केला आहे. याला टक्कर देण्यासाठी हुआवेईचा हा नवा कमी जाडीचा फोन बाजारात आणला गेला आहे. यावर्षी दुप्पट विक्री करण्याचे उद्दीष्ट कंपनीने ठेवले आहे. या स्मार्टफोनमुळे कंपनीची इमेज बदलेल असा दावा केला आहे. दरम्यान, याफोनमध्ये ४ जी नसल्यामुळे या मोबाईलच्या विक्रित घट होईल, असं तज्ज्ञांच्या मते आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.