स्मार्ट की-बोर्ड आणि सेल्फी मोडसहीत 'जी३' लॉन्च

कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी LG नं एका जबरदस्त कॅमेऱ्यासहित नवा स्मार्टफोन जी३ नुकताच लॉन्च केलाय. हा फोन एकाच वेळेस न्यूयॉर्क, लंडन, सॅन फान्सिस्कोमध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 05:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी LG नं एका जबरदस्त कॅमेऱ्यासहित नवा स्मार्टफोन जी३ नुकताच लॉन्च केलाय. हा फोन एकाच वेळेस न्यूयॉर्क, लंडन, सॅन फान्सिस्कोमध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला.
लवकरच आखण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कंपनीकडून हाच फोन सियोल, इस्तंबूल आणि सिंगापूर या देशांमध्येही लॉन्च करण्यात येणार आहे. आजपासून हा फोन दक्षिण कोरियाच्या बाजारात उतरवण्याची घोषणा कंपनीनं केलीय. त्यानंतर हा फोन भारतासहीत १७० देशांमध्ये लॉन्च करण्यात येईल.
आत्तापर्यंतचा उत्कृष्ठ डिस्प्ले
जी३ हा अँन्ड्रॉईड ४.४.२ किटकॅटवर आधारित स्मार्टफोन आहे. सिंगल सिम असलेल्या या फोनची स्क्रीन ५.५ इंचाची आहे. १४४० X २५६० पिक्सलची ही स्क्रीन एलसीडी क्यूएचडी आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, या फोनचा डिस्प्ले हा आत्तापर्यंतचा सर्वात उत्कृष्ठ असा डिस्प्ले आहे. यातील पिक्सलचं घनत्व ५३८ पीपीआय आहे. याचाच अर्थ इतर स्मार्टफोनच्या तुलनेत या फोनचा पिक्सल डबल आहे.
स्मार्ट कीबोर्ड
कंपनीनं, या स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्याचीही व्यवस्था करून ठेवलेली आहे. यासाठी कंपनीनं एक नवा यूआय विकसित केलाय. त्यामुळे टाईपसेटींगही खूप सोप्पं झालंय. या फोनच्या कीबोर्डला स्मार्ट कीबोर्ड म्हटलं जातंय... कारण, हे कीबोर्ड वापरण्यासाठी बोटांना आणि डोळ्यांना त्रास द्यावा लागत नाही. तुम्ही पुढे काय टाईप करणार आहे याचा अंदाज घेऊन हा स्मार्टफोन स्वत:च अक्षरं टाईप करतो..
व्हरायटी
वजनानं हलका असलेला हा फोन मेटालिक ब्लॅक, सिल्क व्हाईट, शाईन गोल्ड, मूड वॉयलट आणि बर्गांडी रेड या रंगांमध्ये उपलब्ध आहे. सडपातळ अशा या स्मार्टफोनचं वजन अवघ १४९ ग्रॅम आहे. हा फोन २.४६ गिगाहर्टझ क्वाडकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसरच्या साहाय्याने चालतो. ३२ जीबीच्या फोनचा रॅम ३ जीबी आहे तर १६ जीबीच्या फोनमध्ये २ जीबी रॅम वापरण्यात आलाय. यामध्ये १२८ जीबीसोबतच एक्सटर्नल सपोर्टचीही व्यवस्था दिली गेलीय.
कॅमेरा
या स्मार्टफोनचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. यात OIS+, ड्यएल एलईडी फ्लॅश आणि लेजर ऑटो फोकसिंग सेन्सरही आहे. केवळ ०.२७६ सेकंदात हा कॅमेरा फोकस करू शकतो. तर या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा २.१ मेगापिक्सलचा आहे. यात F/2.0 अपर्चर आहे. तसंच सेल्फी मोडही दिला गेलाय. यूजरनं कॅमेऱ्यासमोर हात हलवताच फोन आपणहून टायमर स्टार्ट करतो. त्यामुळे तुमचा फोटो लगेचच काढता येतो.
इतर फिचर्स
जी३ मध्ये वायफाय ८०२.११, ब्लूटूथ ४.० एलई, एनएफसी, स्लिम पोर्ट जीपीएस, जीपीएस, जीआरपीएस आणि एलटीई फोर जी म्हणजेच जवळजवळ सगळेच फिचर्स दिले गेलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.