हॉटमेलचा 'आऊट'लूक...

तुम्ही जर अजूनही तुमचं ‘हॉटमेल’ अकाऊंट वापरत असाल, तर आता हे अकाऊंट आपोआप बंद होणार आहे... होय, आणि हे अकाऊंट ‘आऊटलूक डॉट कॉम’च्या नावानं नव्या स्वरुपात तुमच्यासमोर सादर होईल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2013, 11:23 AM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
तुम्ही जर अजूनही तुमचं ‘हॉटमेल’ अकाऊंट वापरत असाल, तर आता हे अकाऊंट आपोआप बंद होणार आहे... होय, आणि हे अकाऊंट ‘आऊटलूक डॉट कॉम’च्या नावानं नव्या स्वरुपात तुमच्यासमोर सादर होईल.
पण, म्हणून तुम्हाला घाबरण्याची काही एक आवश्यकता नाही. तुमचा यूजर आयडी, पासवर्ड, कॉन्टॅक्टस सारख्या गोष्टी तुम्हाला जशाच्या तशा मिळणार आहेत.
‘हॉटमेल’ ही वेबवर आधारित ई-मेल सेवा म्हणून ओळखली जाते. १९९६ मध्ये हॉटमेल लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर मायक्रोसॉफ्टनं त्याला आपल्यात समाविष्ट केलं होतं. या सुविधेत आता काळानुरुप बदल करण्यासाठी आता मायक्रोसॉफ्टनं हे पाऊल उचललंय.

`हॉटमेल`चं रुपांतरण `आऊटलूक`मध्ये करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केली. यामध्ये अनेक सुधारणा करून ही सुविधा पुन्हा लोकांसमोर येतेय.