www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय बाजारात मागील वर्षात तीन मोबाईल हॅण्डसेट लॉन्च करण्यात आले आहेत. यातील तीनही फोन वेगवेगळ्या बजेटचे आहेत.
पहिला आहे एलजी जी फ्लेक्स, दुसरा मोटो जी आणि तिसरा मायक्रोमॅक्स बोल्ड ए 37, हे तीनही फोन वेगवेगळ्या सेगमेंटचे आहेत.
किंमतींचा विचार केला तर यातील कोणताही एक फोन तुम्हाला पसंत येईल, नाही पसंत आला तरी तुम्हाला स्मार्ट फोनच्या निवडीसाठी ही माहिती निश्चित मदतीची ठरेल.
पहिला एलजी फ्लेक्स असा फोन आहे, तो खिशात महाग फोन वापरणाऱ्यांसाठी आहे. कारण या फोनची किंमत 69, 999 रूपये आहे. मोटोरोलाचा मोटो हा एक बजेट स्मार्टफोन आहे.
मोटोरोलाने हा फोन बाजारात आणल्याची मागच्या महिन्यात घोषणा केली होती. या स्मार्ट फोनचा स्टॉक अवघ्या एका तासात खाली झाला होता. फ्लिपकार्टकडे हा फोन विक्रीसाठी देण्यात आला होता.
8 जीबी वाला मोटो फक्त २० मिनिटांत विकला गेला, या फोनची किंमत १२ हजार ४९९ रूपये आहे. यातील १६ जीबी हॅण्डसेटची किंमत १३ हजार ९९९ रूपये आहे, हा स्टॉक ६० मिनिटांत खपला. या फोनचे फीचर्स खूपच आकर्षक असल्याचं सांगण्यात येतं.
बाजारात आलेला तिसरा फोन आहे मायक्रोमॅक्स ए 37. या फोनची किंमत फक्त ३ हजार ९९९ रूपये आहे. या फोनच्या माध्यमातून मायक्रोमॅक्सला स्वस्त स्मार्ट फोन वापरणारा क्लास टार्गेट करायचा आहे.
या स्वस्त स्मार्ट फोनमध्ये ३ जी आणि एंड्राईडची 4.2 जेलीबीनही देण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.