www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चीनची स्वस्त मोबाईल निर्माता कंपनी ‘ओप्पो’नं आपला नवा हँडसेट ‘ओप्पो फाईंड 7 ए’ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च केलाय.
5.5 इंचाचा स्क्रिन असणारा हा अँन्ड्रॉईड स्मार्टफोन फूल एचडी डिस्प्ले देतो. यामध्ये ‘गोरिल्ला ग्लास 3’ चा वापर करण्यात आलाय. याचं रिझॉल्युशन आहे 1920 X 1080... हा स्मार्टफोन 2.3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 801 क्वॉड प्रोसेसरवर चालतो.
या मोबाईलचं वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये असणारा 13 मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा... यामध्ये सोनी कंपनीचा सेन्सर वापरण्यात आलाय. त्यामुळे, तुम्हाला फोटोंची क्वॉलिटीही चांगली मिळते. यामध्ये F/2 अपर्चर देण्यात आलंय. यामध्ये एक सॉफ्टवेअर वापरण्यात आलंय ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्याची ताकद वाढवून 50 मेगापिक्सलपर्यंत नेता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यामध्ये F/2 अपर्चर देण्यात आलंय. याची रॅपिड चार्ज बॅटरी 2800 मेगाहर्टझची आहे.
हा स्मार्टफोन दोन रंगांत उपलब्ध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचं वजन अवघं 170 ग्राम आहे. कंपनीनं या फोनची किंमत भारतामध्ये, 31,990 रुपये इतकी निर्धारित केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.