www.24taas.com , कोरीया
सॅमसंगनं मेगा गॅलेक्सी स्मार्टफोन सादर केला आहे. अँड्रॉईडवर आधारित दोन नवे स्मार्टफोन 'गॅलेक्सी मेगा ६.३' आणि 'गॅलेक्सी मेगा ५.८' सादर केलेत.
'गॅलेक्सी ६.३' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्मार्टफोन ठरलाय. हे दोन्ही फोन अँड्राईड ४.२ जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतील तसेच अजून या दोन्ही मोबाईलची किंमत अजूनही ठरवण्यात आलेली नाही.
तर हे दोन्ही मोबाईल मे महिन्याच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होतील असे सॅमसंगचे आयटी आणि मोबाईल बिझनेसचे सीईओ जेके शिन यांनी जाहीर केले.
'मेगा ६.३'ची वैशिष्ट्ये
स्क्रीन : ६.३ इंच, टीएफटी एचडी
प्रोसेसर : १,७ गीगाहर्टज ड्युअल कोर, १.५ जीबी रॅम
मेमरी : ८ आणि १६ जीबी, ६४ जीबीची एक्सटर्नल मेमरी
कनेक्टिविटी : २जी, ३जी, ४जी, वायफाय, ब्लूटूथ ४.०, माइक्रो यूएसबी २.० आणि एनएफसी.
कॅमेरा : रियर-८.० मेगापिक्सल, एलईडी फ्लॅश आणि फ्रंट- १.९ मेगापिक्सल.
मेगा ५.८ ची वैशिष्ट्ये
स्क्रीन : ५.८ इंच टीएफटी
प्रोसेसर : १.४ गीगाहर्टज ड्युअल कोर सीपीयू, १.५ जीबी रॅम
मेमरी : ८ जीबी, ६४ जीबीची एक्सटर्नल मेमरी
कनेक्टिविटी : २जी, ३जी, वायफाय, ब्लूटूथ ४.० आणि मायक्रो यूएसबी २.०
कॅमेरा : रियर - ८.० मेगापिक्सल, एलईडी फ्लॅश आणि फ्रंट- १.९ मेगापिक्सल.