www.24taas.com , झी मीडिया, ठाणे
बदलापूरमध्ये एका केजीच्या विद्यार्थिनीवर बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची कल्याण परिवहन विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. शाळेच्या बसमध्ये जर एक मुलगी असली तरी लेडी अटेन्डट ठेवणं आता बंधनकारक असणार आहे.
या घटनेनंतर संतप्त जमावाने बस कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, बदलापुरात बसमध्ये घडलेल्या घटनेच्या वेळी बसमध्ये लेडी अटेन्डट नसल्यानं ही घटना घडल्याचं समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक अधिनियम २०११ नियम अंतर्गत डॉन बास्को शाळेच्या मुख्याध्यापिका आणि लक्ष्मी ट्रॅव्हेल्सचा मालक यांच्यावर कल्याण परिवहन विभाग कारवाई करणार आहे.
कल्याण परिवहन विभागाच्या अंतर्गत येणा-या कल्याण, डोंबिवली, शहाड विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अबरनाथ, बदलापूर, टीटवाला या भागातल्या सर्व शाळांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात करण्याचे आदेशही कल्याण परिवहन विभागाकडून देण्यात आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.